VATRATIKA SMS

ऑफर लक्षवेधी

निमित्त साधून एखादं
भरघोस देतात सुट
ऑफरच्या नावाखालीही
कौशली करतात लुट

ऑफरच्या नावाखाली
लोकही करतात खरेदी
म्हणूनच प्रत्येक ऑफर
ठरली जाते लक्ष वेधी

भावनिक सल्ला

माणसां मध्ये भावनांचा
जणू बाजार रंगला आहे
भावनांची अवस्था पाहून
भावनीक दर्जा दंगला आहे

माणसाचं मन माणसाच्या
मनाला ना खुपायला हवे
माणसांनीच माणसांच्या
भावनांना जपायला हवे

विचार

वेग-वेगळ्या मना मध्ये
वेग-वेगळे विचार असतात
कधी विचार स्वाभिमानी
कधी विचार लाचार असतात

कधी प्रचार तर कधी-कधी
चटकदार आचार असतात
अशा वेग-वेगळ्या ऊपमांचे
गमतीशीर-गंभीर विचार असतात

मुर्खपणाचे मोजमाप

आयत्या पिठावर रेघोट्या
मालकी हक्कानं मारतात
दुसर्‍यांनाच करतात पुढे
स्वत:चे अंगही चोरतात

त्यांचा मुर्खपणा मोजायला
सोपी-साधी शक्कल आहे
त्यांच्याच बोलण्यात कळते
त्यांना किती अक्कल आहे

बोलत असताना

बोलताना नेहमीच
सत्य धरून बोलावं
होणार्‍या परिणामांना
थोडं स्मरून चालावं

निराधार बोललं तर
लोकही वाद घेतात
पण तथ्य असेल तर 
टिकेलाही दाद देतात


दुष्काळ पाहताना

या दुष्काळाच्या झळाही
दूष्काळ्यांनाच जाणवतात
नव-नविन आपत्ती घृणा
आता वारंवार खुणावतात

दुष्काळ पाहत असताना
थोडंसं गांभिर्यांनं पहावं
हवेत असणारांनी देखील
मातीच्या टच मध्ये रहावं

खुम खुमी

कुणी कुणाला कमी नाही
प्रत्येककाला ज्ञात आहे
तरीही एकमेकांचा
इथे वारंवार घात आहे

"ध" चा "मा" करणारेही
अजुन इथे कमी नाहीत
असे लोक कुठे मिळतील
ज्यांच्यात खुम-खुमी नाहीत



व्याप

सरकवल्याने ना सरकतो
ऊरकवल्याने ना ऊरकतो
हा कामाचा व्याप सदा
मागे मागेच फिरकतो

कितीही व्याप ऊरकला तरी
तो नव्या नव्याने वाढत असतो
व्याप ऊरकता ऊरकता मात्र
मानवी जीव तडफडत असतो